योग्य निर्णय कसा घ्यावा? | How to take right decision?

नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात दररोज छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात. कधी करिअर निवडायचं असतं, कधी महागडी वस्तू घ्यायची असते, तर कधी नातेसंबंधबद्दल निर्णय घ्यावा लागतो. चुकीचा निर्णय घेतला तर पश्चाताप होतो आणि योग्य निर्णय घेतला तर आयुष्याची दिशा बदलू शकते. 

सर्वात मोठा प्रश्न असा आहे की - योग्य निर्णय कसा घ्यावा?

या लेखामध्ये आपण निर्णय घेण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग जाणून घेणार आहोत.

1) निर्णय भावनांपेक्षा वास्तवाचा विचार करा.

जीवनात कोणताही निर्णय रागात, भीतीपोटी, आनंदात आणि दुःखात घेतला तर तो चुकीचा ठरतो. कोणताही महत्वाचा निर्णय घेताना स्वतःला शांत ठेवा आणि परिस्थिती कडे वास्तववादी दृष्टीने पहा.

उदाहरण : - 
1)रागात कोणतीही महागडी वस्तू खरेदी करणे 
2)भावनेत येऊन पैसे गुंतवणे 

हे निर्णय आपल्याला आर्थिक व मानसिक अशा दोन्ही प्रकारे नुकसान करू शकतात.

2)निर्णय घेण्यापूर्वी माहिती गोळा करा.

कोणत्याही निर्णयापूर्वी तुम्हाला त्या बद्दल संपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. कारण अपूर्ण माहितीमुळे निर्णय चुकीचे ठरतात. 

निर्णय घेताना स्वतःला विचारा 

1)याचे फायदे काय आहे?
2)तोटे काय आहेत?
3)भविष्यात याचा परिणाम काय होऊ शकतो 

3)फायदे आणि तोटे लिहून काढा 

कोणतीही गोष्ट करताना तिचा फायदा आणि तोटा काय होऊ शकतो. ह्याबद्दल जाणून घेणे गरजेचं आहे. कोणताही निर्णय घेताना मनात गोंधळ होतं असेल. तर अशावेळी एका कागदावर पर्यायाचे फायदे आणि तोटे लिहून काढा.

उदाहरण तुम्ही जर नवीन नोकरी जॉईन करणार असाल. तर त्याठिकाणी राहायची आणि जेवणाची सुविधा, कंपनीचे वातावरण, काम वाढणार आणि नवीन रिस्क ला सामोरे जावे लागणार.

4)ऐकावे जनाचे करावे मनाचे 

याचा अर्थ म्हणजे अनुभवी लोकांची मते ऐकून घ्या. लोकांचे विचार ऐकून घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येकाचे जीवन वेगळे असते. त्यामुळे शेवटचा निर्णय तुमचा स्वतःचा असला पाहिजे.

5)अतिविचार म्हणजेच ओव्हरथिंकिंग करू नका.

कोणताही निर्णया अगोदर खूप विचार केल्यामुळे गोंधळ उडतो आणि निर्णय उशिरा घेतला जातो. 

जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा 100% परिपूर्ण कोणताही निर्णय नसतो. कोणताही निर्णय घेतल्यानंतर तो कसा बरोबर आहे, यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागणार आहेत. फक्त विचार करून काहीच होतं नाही.

6)तुमचं ध्येय आणि त्याच महत्व ध्यानात ठेवा.

तुमचा जो निर्णय तुमच्या ध्येयाशी जुळतो तोच योग्य असतो.

उदाहरण - 
जर तुम्हाला आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र बनायचं असेल तर 
विविध कौशल्ये शिकणे 
चांगली गुंतवणूक करणे 
पैशांची बचत करणे 
   हे निर्णय योग्य ठरतील.

7)चुकीच्या निर्णयाची भीती सोडा 

जगातील असा कोणताही व्यक्ती नाही, जो 100% बरोबर निर्णय घेतो. यशस्वी लोकं चुकांमधून शिकून पुढे जातात.

त्यामुळे जर चुक होतं असेल तर ती का झाली? याच उत्तर सापडून पुढे चला. चुकीच्या निर्णयाची मनातून भीती काढून टाका.

8)स्वतःच्या मनातून येणारा आवाज ऐका 

तुमच अंतरज्ञान तुम्हाला योग्य दिशा दाखवू शकते. जर एखादी गोष्ट सतत चुकीची वाटत असेल. तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.

निष्कर्ष 

योग्य निर्णय घेणे म्हणजे  फक्त नशीब नाही तर 

•शांत विचार
 
•योग्य माहिती 

•आत्मविश्वास 

•अनुभव 

यागोष्टींचा योग्य वापर करणे.

मित्रांनो लक्षात ठेवा प्रत्येक निर्णय तुमचं भविष्य ठरवणार आहे त्यामुळे निर्णय घाईघाईत न घेता शांत विचार करून घ्या.


#योग्यनिर्णय #rightdecision #successtipsmarathi #MotivationMarathi #MarathiEducation 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.