•ओव्हरथिंकिंग म्हणजे काय?
एखादी गोष्ट घडण्यापूर्वी किंवा घडल्यानंतर तिच्याबद्दल खूप विचार करणे. भूतकाळातील घडलेल्या गोष्टींना आठवून त्याबद्दल विचार करत राहणे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे भविष्याची अति काळजी करणे. भविष्यात काय होणार? याबद्दल विचार करत राहणे. गरजेपेक्षा जास्त विचार करणे. म्हणजेच ओव्हरथिंकिंग.
यामध्ये व्यक्ती वारंवारं त्याच गोष्टींचे विश्लेषण करत राहतो, पण त्यातून कोणताही निष्कर्ष निघत नाही.
•ओव्हरथिंकिंग ची कारणे कोणती आहेत?
1)भविष्याबद्दल चिंताग्रस्त राहणे.
2)आत्मविश्वासाची कमतरता असणे.
3)दुसऱ्यांशी स्वतःची तुलना करणे.
4)स्वतः परिपूर्ण नसल्याची भावना
5)भूतकाळातील वाईट अनुभव
6)स्वतः पेक्षा इतरांची काळजी जास्त घेणे.
•ओव्हरथिंकिंग कमी करण्याचे उपाय कोणते आहेत?
1) विचार कागदावर लिहायला शिका.
तुम्ही जेव्हा डोक्यातील विचारांना कागदावर लिहायला सुरु करता. तेव्हा तुम्हाला एक क्लेरिटी येते. ज्यामुळे ताण तणाव कमी होतो.
2)निर्णय घेण्यासाठी वेळ मर्यादा ठरवा.
लहान गोष्टींसाठी खूप वेळ विचार करण्यात घालवू नका. ठराविक वेळेत निर्णय घेण्याची सवय लावा.
3)वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा.
जीवनात एक गोष्ट नेहमी ध्यानात ठेवा की भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्यकाळ आपल्या हातात नसतो. त्यामुळे सध्याच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा.
4)ध्यान आणि योगाचा सराव करा.
जर तुम्ही दररोज थोड्या वेळ ध्यान आणि योगासने केली तर मन शांत ठेवण्यास मदत होते. त्यासोबत मनातील विचारांवर नियंत्रण ठेवता येते.
5)स्वतःला कामात व्यस्त ठेवा.
बिनकामी मेंदू शैतानाच घर असते म्हणजेच मेंदू मध्ये कामाबद्दल विचार नसतील तर नकारात्मक विचार जागा घेतात. त्यामुळे स्वतःला कामात व्यस्त ठेवा. घरचे किंवा ऑफिस च काम नीट करा. मोकळ्या वेळेत पुस्तकं वाचा, व्यायाम करा, चांगलं सांगित ऐका आणि नवीन कौशल्य शिका. यांसारख्या सकारात्मक गोष्टीं मध्ये स्वतःला घुंतवा.
6)दररोज पुरेशी झोप घ्या
झोपेची कमतरता मानसिक तणाव वाढवू शकते त्यामुळे दररोज 7-8 तास झोप घ्या.
7)नकारात्मक विचाराना आव्हान द्या.
कोणताही नकारात्मक विचार आल्यावर स्वतःला विचारा हा खरा आहे का? कारण आपण छोट्या भीतीला मोठं बनवतो.
•ओव्हरथिंकिंगचे दुष्परिणाम काय आहेत?
•तणाव आणि चिंता वाढणे
•निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे
•आत्मविश्वास कमी होणे
•झोपेच्या समस्या होणे
•मानसिक आणि शाररिक थकवा
निष्कर्ष
ओव्हरथिंकिंग ही एक सामान्य आणि घातक समस्या असली तरी योग्य सवयी आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ती कमी करता येते. वर्तमानात जगणे, ध्यान करणे, स्वतःला कामात व्यस्त ठेवणे आणि नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे असे वेगवेगळे उपाय आपण करु शकतो.