मानवी मेंदूबद्दल 10 धक्कादायक तथ्ये | 10 Human Brain Facts

नमस्कार मित्रांनो माणसाच्या शरीरातील सर्वात महत्वाची अवयव म्हणजे मेंदू कारण मानवी मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात रहस्यमयी आणि शक्तिशाली अवयव मानला जातो. तो आपल्या विचारांपासून भावना, आठवणी, निर्णय आणि शरीराच्या प्रत्येक हालचालीवर नियंत्रण ठेवतो. विज्ञानाने खूप प्रगती केली असली तरी मेंदूबद्दल अजूनही अनेक गोष्टी रहस्यच आहेत. या रहस्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1)मेंदूला वेदना होतं नाही 
कारण मेंदूमध्ये वेदना जाणवणारे रिसिप्टर्स नसतात. म्हणूनच मेंदूच्या काही शस्त्रक्रिया रुग्ण जागा असताना केल्या जातात. ही गोष्ट विचित्र वाटली तरी खरी आहे.

2)झोपेत असताना पण मेंदू कार्यरत असतो.
आपण झोपलो तरी मेंदू स्वतःच काम पूर्णपणे बंद करत नाही. उलट काही वेळा तो जागेपेक्षा अधिक सक्रिय असतो. स्वप्न, जुन्या आठवणीची प्रक्रिया आणि शरीराचे नियंत्रण हे काम तो झोपेत करतो.

3)मेंदूचे वजन किती आणि ऊर्जा किती वापरतो?
मानवी मेंदूचे वजन साधारण 1.3 ते 1.5 किलो एवढं असते. म्हणजेच तो शरीराच्या वजनाच्या फक्त 2% असतो. पण आश्चर्य म्हणजे शरीरातील जवळपास 20% ऊर्जेचा वापर मेंदू करतो.

4)मेंदूत 86 अब्ज  मज्जापेशी असतात 
मेंदूत अब्जावधी मज्जापेशी (न्युरोन्स ) असतात. या पेशी एकमेकांना संदेश पाठवून आपल्या शरीराचे सर्व कार्य सुरुळीत करतात.

5)मेंदूवर सोशल मीडिया चा परिणाम होतो 
तुम्ही जर जास्तीत जास्त सोशल मीडिया चा वापर केला तर मेंदूवर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. त्याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होणे.

6)मेंदूला ऑक्सिजन ची खूप गरज असते.
जर मेंदूला पाच मिनिटे ऑक्सिजन नाही भेटला तर मेंदूच्या पेशींना कायमचे नुकसान होऊ शकते. 

7)मेंदू नवीन गोष्टीं शिकून स्वतःला बदलू शकतो.
नवीन सवयी, ज्ञान आणि अनुभवामुळे मेंदू स्वतः मध्ये बदल करू शकतो. त्याला नियुरोप्लास्टिसिटी म्हणतात.

8)हसल्याचा मेंदूवर काय परिणाम होतो?
जेव्हा आपण हसतो तेव्हा मेंदू डोपामाईन रसायने तयार करतो. त्यामुळे ताण तणाव कमी होतो आणि मन प्रसन्न राहते.

9)मेंदूची माहितीची गती 
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की मेंदूची माहिती ची गती ताशी 400 किमी पेक्षा जास्त असू शकते. त्यामुळे आपण काही क्षणात प्रतिक्रिया देऊ शकतो.

10)मानवी मेंदूची समरणशक्ती किती असते?
मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल जसा मोबाईल ला एक लिमिटेड स्टोरेज असतो. तसा मेंदूला लिमिटेड स्टोरेज नसतो. वैज्ञानिकांच्या मते मेंदू लाखों GB डाटा साठवू शकतो. आजपर्यंत मेंदूची पूर्ण स्टोरेज क्षमता मोजता आलेली नाही.

निष्कर्ष 
मानवी मेंदू हा रहस्यमयी आणि निसर्गाचा अद्भुत चमत्कार आहे. जेवढं आपण त्याच्या बद्दल जाणून घेतो तेवढं आपल्याला आश्चर्य वाटते. योग्य झोप, चांगलं जेवण, सकारात्मक विचार आणि व्यायाम मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहे.

#मानवीमेंदू #marathifact #humanbrain 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.